शिरूर कासार: तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील मासे पकडणारा व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल
शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील प्रवाह अचानक वेगवान झाला. या वेगवान प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती वाहून गेला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली असून प्रशासनालाही याबाबत कळविण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे, अशी सतत सूचना प्रशासनाकडून केली जात आहे.