राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आज दि २८ ऑक्टोबर ५ वाजता मनपा चंद्रपूर ने कळविले आहेत.