जालना: जालना शहरात भररस्त्यात मोबाईल हिसकावण्याची घटना; तिघांविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Apr 7, 2026 जालना शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात भररस्त्यात मोबाईल हिसकावण्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खंडु रामभाऊ गायकवाड रा. जिरडगाव ता. घनसांवगी जि. जालना हे परतूर येथून ट्रेनने जालना येथे आले होते. रेल्वे स्थानकातून मार्केटकडे जात असताना ते मोबाईलवर नातेवाईकांशी बोलत होते.