अक्राणी: कुपोषणमुक्त ग्रामपंचायतीकडे कात्रीचा ठाम संकल्प
कुपोषणमुक्त ग्रामपंचायत' हा उद्देश साध्य करण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीने ठाम पावले उचलली आहेत. सरपंच संदीप दादा वळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत आयोजित विशेष बैठकीत डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत कात्री ग्रुप ग्रामपंचायत पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्नांद्वारे ग्रामपंचायतीतून कुपोषण मुक्त होणार.