सातारा: साताऱ्यात गोलबागेसमोर गटरचे काम सुरु असल्याने वाहतूकीत तात्पुरता बदल
Satara, Satara | Sep 20, 2025 सातारा नगरपालिकेच्यावतीने गोलबागेच्या समोर गटरचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या कारणास्तव वाहतूकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. तांदूळआळीतून राजवाडा बसस्टॅण्डकडे वाहने सोडली जात आहेत. तर राजवाडा बसस्टॅण्डकडून राजपथाकडे येणारी वाहने ही अन्य मार्गाने वळवली गेली आहेत. तेथे वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून असा बदल सातारकरांना पहायला मिळाला.