हिंगणघाट: अल्लीपूर ते तळेगावपर्यंतचा जुना शिवपांदण रस्ता नव्याने करा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व शिवराया संघटनेची प्रशासनास मागणी
हिंगणघाट राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व शिवराया संघटना यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे तहसीलदार योगेश शिंदे यांना अल्लीपूर ते तळेगाव पर्यंत ( सोनपेठ शिवार) जुना असलेल्या पांधण रस्ता नव्याने करण्याबाबत व या रस्त्यावरील पुलांची निर्मिती करण्याबाबत निवेदन देण्यात आले,यावेळी सदर सोनपेठ शिवारात शेती असणारे सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,यावेळी सदर पांधन रस्त्याने शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी होत असलेल्या अडचणीसुद्धा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.