पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने खुटारी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार आहे. खुटारी येथील गंगाराम म्हात्रे ते परशूराम म्हात्रे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हे काम 26 लाख 29 हजार 777 रुपये निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले.