वर्धा: उपप्रादेशिक परिवहन विभागाचे न्यु इंग्लिश येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर व आपत्कालीन सेवा प्रात्यक्षिकाचे आयोजन
Wardha, Wardha | Jan 11, 2026 37 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अग्निशमन विभाग, नगरपरिषद वर्धा व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर व आपत्कालीन सेवा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोटर वाहन निरीक्षक श्रीमती अनुराधा जाधव यांनी विद्यार्थ्यांना रस्ता वापरताना घ्यावयाची काळजी व वाहतूक नियमांची म