कळंब: आमदार कैलास पाटील यांनी शेलगाव,सातेफळ परिसरात केली नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी
कळंब तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची आमदार कैलास पाटील यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली यासह अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. "पाहणी वेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि भविष्यातील अनिश्चितता स्पष्टपणे जाणवत आहे. जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.