चांदूर बाजार: सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत आरोग्य केंद्र खेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज दिनांक 24 सप्टेंबरला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र खेड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 225 रुग्णांची तपासणी या शिबिरातून करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लढ्ढा, यांचे सह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयस्वाल व तज्ञ डॉक्टरांची चमु या शिबिरा करिता उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी या शिबिराकरिता उपस्थित होते