वसई: बरफपाड्याच्या ओम साई सहारा चाळीत राहणाऱ्या गणेश पठारे याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली
Vasai, Palghar | Apr 18, 2024 बरफपाड्याच्या ओम साई सहारा चाळीत राहणाऱ्या गणेश पठारे (२६) याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. ७ एप्रिलला रात्री राहत्या घराच्या बाहेर दुचाकी पार्क केली होती. चोरट्याने पार्किंग केलेली दुचाकी चोरून नेली आहे. विरार पोलिसांनी मंगळवारी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.