राजुरा नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवक पदांसाठी आज दि 17 नोव्हेंबर 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षपदाकरिता राधेश्याम अडाणीया यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.