जालना: कृषी विभागाने आम्हाला बोगस सोयाबीन बियाणे दिले,भागवत जाधव या शेतकऱ्याचा रेवगाव येथे कृषी विभागावर आरोप
Jalna, Jalna | Jul 9, 2026 आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील रेवगाव येथे असलेले शेतकरी भागवत जाधव यांनी कृषी विभागावर आरोप केला आहे की त्यांना कृषी विभागाकडून मोफत सोयाबीन बियाणे देण्यात आले मात्र हे सोयाबीन बियाणे बोगस असून त्यांनी एक जुलै रोजी जी सोयाबीनची पेरणी केली अद्यापही ती उगवली नाही त्यामुळे आम्हाला तात्काळ कृषी विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.