भंडारा: शहापूर सुर नदीजवळ स्कुटीचा दुर्दैवी अपघात; तरुणाचा मृत्यू, जवाहरनगर पोलिसांत घटनेची नोंद
भंडारा-नागपूर मार्गावर दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:४५ वाजता दरम्यान एका दुर्दैवी अपघातात पवन नरेंद्र सोनकुसरे (वय २४, रा. गरदेव चौक, मौदा, जि. नागपूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली आहे. मृतक पवन सोनकुसरे हा त्याची विना क्रमांकाची नवीन पांढऱ्या रंगाची सुझुकी बर्गमॅन या स्कुटीने शहापूर जवळून जात असताना, वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याची मोपेड रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला जोरदार धडकली.