नगर: साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या समन्वयाने अहिल्या नगर शहरात दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय साहित्य संमेलनाचा आयोजन करण्यात येत आहे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजन समिती संयोजक सचिन मोहन चौबे यांनी दिली