जळगाव: उमाळे फाट्याजवळ बस अपघातात तरूणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीसात बसचालकावर गुन्हा दाखल
उमाळे फाट्याजवळ ओव्हरटेक करतांना बसचा कट लागून झालेल्या अपघातात योगेश रामहरी नंदे (रा. शिवाजी नगर) हा तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास उमाळा गावाजवळ घडली होती. याप्रकरणी रात्री ८ वाजता बस चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.