हिंगोली: मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू
हिंगोली यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एजे ही संपुष्टात आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन मालिका एमएच-38-एएम0001 ते 9999 ही मालिका चालू करण्यात येत आहे.ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन पध्दतीने आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गावंडे यांनी केली आहे.