वरोरा: तुराणा घाटावर वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश
वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले होते. मात्र दोन मुले पाण्यात बुडाल्याने त्यांचा अंत झाला. मृतदेह आज दिनांक 3 नोव्हेंबरला सांग दुपारी 3 वाजता सापडले सदर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.