बार्शीटाकळी: भूमिहीन शेतमजुरांचा शासनाविरोधात अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन केल आंदोलन
शासकीय जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी शिक्षा भोगल्यानंतरही अकोला जिल्ह्यातील हजारो एकर जमीन फॉरेस्ट, सामाजिक व इतर कारणांवर वर्षानुवर्ष रिकामी पडली आहे. मात्र भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप होत नाही. त्यामुळे शेतमजुरांचा दर्जा वाढावा, प्रत्येकाच्या नावावर सातबारा यावा तसेच शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाने पावले उचलावी. भूमिहीनांना शासकीय जमीन देण्यात यावी किंवा शासनाने जमीन विकत