प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 'गो ग्रीन' संस्थेच्या पुढाकारातून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 'बॉटल बिन'ची स्थापना करण्यात आली आहे. गो ग्रीन संस्थेचे संस्थापक भरत सोनी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या बिनच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा व बाटल्या एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार असून प्लास्टिक प्रदूषण रोखण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.