हिंगोली: सेनगाव बाजारपेठेत पोलिसांची कारवाई खंजीरासह एकास ताब्यात तर 15 ट्राफिक केसेस नोंदविण्यात आल्या
सेनगाव येथील आठवडी बाजारात पोलिसांनी नियमित पेट्रोलिंग दरम्यान संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे खंजीर आढळून आल्याने त्याच्यावर कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विना परवाना वाहनचालकांवर कारवाई करत एकूण १५ ट्रॅफिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. हीकारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, ग्रामीण उपविभागीय अधिकारी श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वात करण्यात आली