नांदगाव खंडेश्वर: महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची आमदार प्रताप अडसड यांनी घेतली भेट
आज १४ ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री ९ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची आमदार प्रताप अडसड आज मुंबई येथे भेट घेतली यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने बांधकाम कामगारांच्या साहित्य किट वाटपा संदर्भात वारंवार येणाऱ्या तक्रारी व अडचणी संदर्भात दखल घेत धामणगाव रेल्वे मतदार संघामध्ये केंद्र देण्यासंदर्भात आमदार प्रताप अडसड यांनी मागणी केली...