समुद्रपूर: चिखली येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतातील गोठ्याला आग : शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान
चिखली गावापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्याला शार्ट सर्किट अचानक आग लागली या आगीत शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चिखली येथील शेतकरी प्रशांत पांडुरंग बाहुरे यांच्या गावापासून १ किलोमीटरहून अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली घटनेची माहिती शेतकरी व गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शेतीकडे धाव घेतली मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गोठ्याला राख केले यात शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.