समुद्रपूर: पंचगव्हाण शिवातील पांदन रस्त्यावर पि.व्हि.टेक्सटाईलचे अतिक्रमण खुला करून देण्याची शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी
समुद्रपुर तालुक्यातील जाम येथिल पि.व्हि.टेक्सटाईल कंपनीने पंचगव्हान शिवारात शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी मसहुलच्या रेकॉर्डवर असलेल्या पांदन रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण केले आहे.यामुळे शेतकऱ्यांसमोर आता शेतात जायचे कसे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तरी या पांदन रस्त्यावरील पि.व्हि.टेक्सटाईल कंपनीकडून केलेले अनाधिकृत अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव सचिन गावंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदाराना दिले आहे.