समुद्रपूर: भवानपूरच्या अनेक महिला पुरुषाचा शिवेसेना उबाठा पक्षात पक्ष प्रवेश
भवनानपूर येथील अनेक महिला पुरुषांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा सह संपर्क प्रमुख सीताराम भुते यांच्या नेतृत्वात प्रवेश घेऊन शिवबंध बांधले यावेळी जिल्हा सह संपर्क प्रमुख सीताराम भुते, तालुका प्रमुख प्रभाकर चामचोर, उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोयर, राकेश चंदनखेडे, खेमराज राऊत, बालू झाडे यांची उपस्थिती होती. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व संपर्कप्रमुख रमेश जाधव यांच्या आदेशाने पक्ष बांधणीचे कार्य जिल्हा सह संपर्कप्रमुख सीताराम भुते करीत आहे.