राधानगरी: राधानगरी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर.
राधानगरी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले असून सोमवारी पंचायत समिती राजर्षी शाहू सभागृहात आरक्षण सोडत आज सोमवार 21 जुलैला पार पडली.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार ही सोडत तहसीलदार अनिता देशमुख, नायब तहसीलदार बिपिन लोकरे, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे, निवडणूक ऑपरेटर सचिन पाटील यांच्या उपस्थितीत झाली. सायंकाळी चार वाजता तहसीलदार अनिता देशमुख यांनी माहिती दिली.