श्रीगोंदा-सिद्धटेक मार्गे अहिल्यानगरला जाणाऱ्या श्रीगोंदा आगाराच्या बसमधून अचानक धूर निघू लागला होता. स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत चालकांस बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. इंजिनात झालेल्या तांत्रिक बिघाडाने लागलेला जाळ पाणी मारून विझवण्यात आला. युवकांनी दाखवलेल्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.