कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून 25 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या तलाठी कार्यालयाचे आज २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे, संचालक मनोज जगझाप, सुनिल मांजरे, चंद्रशेखर कडवे, दगु भाकरे, शिवाजीराव वाघ, नारायण बारे, विलास भाकरे, सचिन कुऱ्हाडे उपस्थित होते.