जळगाव: सुप्रीम कंपनीच्या गेटवर तरुणावर हॉकी स्टिक आणि धारदार शस्त्राने हल्ला; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
सुप्रीम कॉलनी येथे कामावरून सुटल्यानंतर मुख्य गेटवर पंचिंग करण्याच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी, ३ मे रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.