मुंबई: सँडहर्स्ट रोड स्थानक परिसरात स्वच्छतेसंदर्भात रॅली काढून परिसराची स्वच्छता
Mumbai, Mumbai City | Feb 10, 2024
सँडहर्स्ट रोड स्थानक परिसरातील डोंगरी सेक्शन मधील डॉ. मैशेरी रोड, डोंगरी मंडई व एसव्हीपी रोड या तीन ठिकाणी शनिवार, (ता.10) फेब्रुवारी रोजी महानगर पालिकेच्या 'ब' विभागाच्या वतीने सँडहर्स्ट रोड स्थानक व्यवस्थापक विनायक शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेसंदर्भात रॅली काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली.यावेळी लोकप्रतिनिधी रुपेश पाटील, मनपा बी विभाग सहायक आयुक्त उद्धव चंदनिशिवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद माने, मनपाचे 80 कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश होता.