अक्कलकुवा: ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे सरपंच उषाताई बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न; आमदार आमश्या पाडवी यांची उपस्थिति
ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिनांक 15 अगस्त 2015 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास लोकनियुक्त सरपंच उषाताई प्रवीण बोरा यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. पश्चात ध्वजारोहण करण्यात आले होते.