ठाणे - कोरडा दिवस पाळा, हिवताप डेंग्यू चिकनगुनिया हे आजार टाळा!
684 views | Thane, Maharashtra | Apr 25, 2025 ठाणे - हिवताप ,डेंग्यू, चिकनगुनिया हे कीटकजन्य आजार आहेत. यांची लागण ही डासांमार्फत होते, म्हणून आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून घरामध्ये साठलेले पाणी साठे नियमित बदलून आठवड्यातून एक दिवस तरी भांडी कोरडी करावीत. आजुबाजूला जिथे डास अळ्या तयार झालेल्या दिसतील तिथे त्या नष्ट कराव्यात. आजुबाजूला बरेच दिवस साचून राहिलेल्या पाण्यामध्ये टेमिफॉस टाकावे..कचरा कुंड्या, टायर, करवंटी यामध्ये पाणी साचून डास तयार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.