वरोरा: वरोरा नगर परिषदेला अखेर कायमस्वरूपी मुख्याधिकारी
शिंदे शिवसेना लोकसभा संघटक जिवतोडे यांच्या मागणीला यश
वरोरा नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी अखेर आज दि 19 सप्टेंबर ला 12 वाजता मान्य झाली असून, शासनाने सिद्धार्थ मेश्राम यांची वरोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली आहे. ही मागणी शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली होती.