म्हसळा: म्हसळा येथे अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा (मुरूड) शैक्षणिक संस्थेच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार
Mhasla, Raigad | Oct 25, 2025 आज शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास म्हसळा येथे अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा (मुरूड) शैक्षणिक संस्थेच्या वतीने खासदार सुनील तटकरे तसेच संस्थेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एक शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहणे हे माझे नैतिक कर्तव्य मानतो. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. शिक्षण क्षेत्रात या संस्थेने केलेले कार्य प्रेरणादायी असून, समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात संस्थेची मोठी भूमिका आहे. या कार्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा सदैव या संस्थेबरोबर राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यक समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने भरीव कार्य केले आहे.