भोकरदन: पारध, पिंपळगाव रेणुकाई सह तालुक्यात ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती मशागतीच्या कामांना वेग
आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वडोद तांगडा यासह संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतींच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे ही कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात असून भर उन्हाच्या तडाख्यात ही शेतकरी राजा शेती मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यातील ठीक ठिकाणी गाव गावात पाहायला मिळत आहे.