जालना: रामनगर साखर कारखाना परिसरात झाडा-झुडपांना आग; धुरामुळे जालना-मंठा रोडवर वाहतूक मंदावली
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखाना परिसरात असलेल्या झाडा-झुडपांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली असून, या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही आग आजुबाजूलाही पसरत गेल्याने आग जवळपास सर्वत्र पसरु लागली. त्यामुळे अग्नीशामक दलाच्या बंबाने काही भागातील आग विझविण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर ती वेगाने पसरत गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.