अंबरनाथ: बदलापूर मध्ये मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना एका सोसायटीतील घरात लागली भीषण आग
बदलापूर मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घरामध्ये आग लागल्याची घटना घडली. बदलापूरच्या सोनवली येथे त्रिशूल गोल्डन वेदा सोसायटीत एका घरामध्ये मध्यरात्री सर्वजण गाढ झोप येत असताना आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती दिली. तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.