पारोळा: समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय- विकास देशपांडे
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे.