कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक २१० शेतकऱ्यांना एकूण ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपये कांदा अनुदान मंजूर झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते. पाठपुराव्या नंतर अनुदान मंजुर केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आज २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा दिली आहे.