अमरावती: अमरावती मनपाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा विविध साड्यांचा फॅशन शो ठरले आकर्षण
अमरावती शहरातील सांस्कृतिक भवनात सुरु असलेल्या “दिवाळी आनंदोत्सवाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, दररोज नागरिक, विद्यार्थी, कुटुंबे आणि कला प्रेमींची गर्दी होत आहे. या महोत्सवामुळे शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या भव्य सांस्कृतिक महोत्सवात बचत गटातील महिलांचा विविध साड्यांचा फॅशन शो आकर्षण ठरले.