नांदेड: रेल्वे स्टेशन परिसरातील 2 रेल्वे क्वार्टरमध्ये चोरी,अज्ञात चोरट्याने लाखो रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून चोरटे फरार
Nanded, Nanded | Sep 14, 2025 आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यानी दोन घरावर डल्ला मारत लाखो रुपयाची सोनं चांदीचा ऐवज लंपास केला. चंद्रकांत झुंजारे आणि चंदनपाल याच्या रेल्वे कॉटर मधील घरी चोरीची घटना घडली. घटनेच्या वेळी दोन्ही कुटुंबीय घराला कुलूप लावून गावाकडे गेले होते. घरात प्रवेश केला. कपाट फोडून त्यातील लाखो रुपयाचे सोनं चांदी चोरी करून फरार झाले. वजीराबाद पोलिस चोरट्याचा शोध पोलीस घेत आहे.