नागपूर शहर: कारने एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळमना
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 17 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार कारने एमडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे. कारच्या झडती दरम्यान आरोपीकडून एमडी देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपीं विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे