राधानगरी: भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा उडवला धुव्वा, इचलकरंजीत फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रिकेटप्रेमींचा जल्लोष
आशिया चषकात झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. दरम्यान रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेपर्यंत इचलकरंजी शहरात क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. विशेषतः जनता बँक चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. क्रिकेटप्रेमींनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आपल्या आनंदाला व्यक्त केला.