भंडारा: विषारी औषध प्राशन करून फुटाळा येथील तरुणाची आत्महत्या; जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू
विषारी औषध प्राशन केल्याने एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुमित ओमप्रकाश वैध (वय ३४, रा. फुटाळा, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) याने विषारी औषध प्राशन केले. त्याला तातडीने सौंदळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी गोंदिया येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथूनही त्यांना नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.