जालना: नाव्हा येथील सद्गुरू रंगनाथ महाराज गोशाळेचा व्हिडिओ व्हायरल; जनावरांच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह
Jalna, Jalna | Jun 23, 2026 जालना जिल्ह्यातील नाव्हा येथे असलेल्या सद्गुरू रंगनाथ महाराज संस्थानच्या गोशाळेतील जनावरांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनाबाबत विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. संबंधित संस्था सध्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत असून, गोशाळेतील जनावरांच्या देखभालीवरून चर्चा रंगू लागली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गोशाळेतील गायी आणि वासरे एकत्रितपणे असल्याचे दिसून येत आहे. तसेच जनावरांना पुरेसा चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का