दिग्रस: तहसिल कार्यालयात पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ,अनेक इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा
दिग्रस पंचायत समितीच्या आरक्षण सोडत आज दि. 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत पार पडला.तालुक्यातील सहा गणांसाठी ही सोडत काढण्यात आली असून, निकाल जाहीर होताच इच्छुकांमध्ये “कही खुशी,कही गम” असे मिश्र वातावरण पाहायला मिळाले. जिल्हा परिषद सदस्यपदाच्या आरक्षणाची घोषणाही याच दिवशी यवतमाळ येथे करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.