निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विरोधी पक्षांकडून करण्यात येणाऱ्या अपप्रचारावर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या विरोधकांकडून "फुसके बार" सोडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. भोंडेकर यांनी १ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. स्पष्ट केले की, हार्ट ॲटॅक, धाडी (रेड) पडणे अशा त्यांच्या आरोग्याबाबत व इतर गोष्टींबाबत पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवा खोट्या आहेत. "मी सुदृढ आहे आणि प्रत्येक वॉर्डात फिरत आहे," असे त्यांनी आपल्या शुभचिंतकांना आश्वस्त केले.