घरात सुरू असलेल्या वादात तरूणाने तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली व ही धमकीच त्याच्या अंगलट आली. तलवारीची धमकी दिल्याने चार्ली पथकाने तलवार असल्याचे हेरून त्या तरूणाच्या घरातून तलवार जप्त केली. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत वसंतनगर परिसरात शनिवारी (दि.१०) रात्री ११.३३ वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. वसंतनगर परिसरात एमडीटीवरून भांडण सुरू असल्याचा कॉल प्राप्त झाल्यानंतर रामनगर प