जत: जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले
Jat, Sangli | Aug 30, 2025 जत तालुक्यातील जाडर बोबलात गावात चोरट्याने मास्क घालून रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. गावात तोंडाला मास्क लावून फिरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार चोरट्याने रात्रीच्या वेळी काही बंद घरे आणि दुकाने लक्ष केली तर काही घरांमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. काही ठिकाणी किरकोळ वस्तू आणि रोख रक्कम चोरीस गेल्या आहेत. एका ठिकाणी तब्ब्ल ७८ हजार रुपये चोरीस गेले आहे.