भावनिक क्षणांनी भारलेला शपथविधी; नगराध्यक्ष सुनिता खेतमाळींच्या अश्रूंनी वातावरण गहिवरले लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठीच सत्तेचा उपयोग केला जाईल, खुर्चीचा हक्क बजावण्यासाठी नव्हे—असा ठाम विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिता खेतमाळी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदभार स्वीकारलेल्या या कार्यक्रमात मात्र एक भावनिक क्षण उपस्थितांच्या लक्षात राहिला.